Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास मान्यता

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास मान्यता

पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना व्यापक आणि प्रभावी स्वरूप देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यास पुणे महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील ठराव उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिला होता.

सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेली – सविस्तर बातमी 

या समितीसाठी सामाजिक, शैक्षणिक व समतावादी विचारांच्या व्यापक प्रसाराला तसेच महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून द्विशताब्दी वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समतावादी विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच त्यांच्या कार्याची माहिती विविध माध्यमांतून नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे.

यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष तसेच महात्मा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार तज्ज्ञ समितीचे कामकाज लवकरच सुरू करण्यात येणार असून, समितीच्या माध्यमातून द्विशताब्दी वर्षासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम आणि आयोजनांची सविस्तर रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×