Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना

तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना

पुण्यात माळी महासंघाकडून निषेध

marathinews24.com

पुणे – क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध असो… क्रूर समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे… महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो… अशा घोषणा देत माळी महासंघ पुणे शहर च्या वतीने माळी समाज बांधव आणि फुले प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. तेलंगणा राज्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.

शरद पवारांची तब्येत बिघडली – सविस्तर बातमी 

यावेळी माळी महासंघ पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप, महिला अध्यक्ष स्मिता लडकत, नाना कुदळे, बाळासाहेब लडकत, सोमनाथ बटवाल, यशोधन आखाडे, चांगदेव पिंगळे ,शशिकला ढोले पाटील, राजेंद्र लडकत, प्रज्वल बनकर, रीमाताई लडकत, गिरीश झगडे, रवी सहाणे, प्रतिभा झगडे विजय कोठावळे, अभिजीत भुजबळ, शांता ताई नेवसे, मारुती भुजबळ, सारंग राऊत गणेश वाडकर यांसह समाजबांधव, भगिनी व फुले प्रेमी उपस्थित होते.

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी हल्ला करून केलेल्या विटंबनेची घटना घडली. ही घटना निंदनीय असून या हीन कृत्याचा आणि यात सहभागी समाजकंटकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे. अशा मनोविकृत लोकांचा जाहीर निषेध करण्यासाठी माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने करण्याकरिता निषेध आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष दीपक जगताप म्हणाले, ज्या महात्मा फुले यांनी पुणे शहरातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. चांगल्या विचारांचे लोक तयार केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. त्यांची विटंबना होत असेल, तर अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. ज्यांनी ही विटंबना केली, त्या समाजकंटकांवर तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×