Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुणे- पिंपरीतील दारूकांडातील मुख्य आरोपी जेरबंद

पुणे- पिंपरीतील दारूकांडातील मुख्य आरोपी जेरबंद

फरारी काळात बदलला लूक; उरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाईल पाठलाग

marathinews24.com

पुणे – शहरासह पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी बाळू लोंढे याने फरार काळात लूकच बदलला होता. दाढी-मिश्या वाढवून तसेच कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू दाढी मिशा काढून अन् मळकट कपडे घालून वावरत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पुण्यात ४ कोटी ११ लाखांचे ४५५ किलो अंमली पदार्थ नष्ट – सविस्तर बातमी 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. याप्रकरणात आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक झाली आहे. सध्या ते सर्व आरोपी न्यायालयीन कोठीत आहेत. रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या शोध सीआयडीची पथके घेत आहेत. हा प्रकार २६ ते २८ मे या कालावधीत दापोडी तसेच हडपसर परिसरात घडला होता. दारू मृत्यूकांडामुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
तपासात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दरम्यान या दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्ह्यानंतर फरार झाला होता. सीआयडी, तसेच पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो मे महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. ऊरळी कांचन पोलिसांना बाळू लोंढे हा लोणी काळभोर तसेच ऊरळी कांचन या भागात असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून त्याचा गुप्त पद्धतीने शोध घेत होते. बुधवारी सायंकाळी त्याला पोलिसांना अखेर जेरबंद केले. त्याला पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळू लोंढे याच्या अटकेमुळे दारू मृत्यूकांडाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात त्याची भूमिका, दारूचा पुरवठा, संबंधित व्यक्ती तसेच मृत्यूकांडामागील संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य आरोपी आणि संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×