Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावी करा – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावी करा – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांचे शोषण, अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणीची मागणी

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे व मद्यपान कक्ष (बार रूम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासंदर्भातील (सुधारणा) विधेयक, २०२६ वर विधानपरिषदेत चर्चा करताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, २००५-०६ मध्ये डान्सबारविरोधी कायदा मंजूर होत असताना त्यांनी त्याला समर्थन दिले होते. त्या कायद्यामुळे डान्सबारचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आजही अनेक ठिकाणी गुप्त किंवा खासगी स्वरूपात डान्सबार सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यभर अशा ठिकाणांची सखोल पडताळणी करून वास्तवस्थिती समोर आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या सुधारणा विधेयकात ऑर्केस्ट्राचाही समावेश करण्यात आल्याचे स्वागत करताना त्यांनी महिलांचे शोषण रोखणे, अल्पवयीन मुलींची तस्करी थांबवणे आणि त्यांना डान्सबारमध्ये काम करण्यास भाग पाडणाऱ्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. अनेक मुलींना वेट्रेस म्हणून दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

डॉ. गोऱ्हे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीत पोलिसांबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अश्लील सादरीकरण यामधील स्पष्ट फरक ओळखण्यासाठी तज्ज्ञांची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यथा कायद्याचा गैरसमज होऊन वैध सांस्कृतिक कार्यक्रमांनाही अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

डान्सबारविरोधी कायद्याला न्यायालयीन आव्हाने आणि प्रभावी लॉबींचा सामना करावा लागला असला, तरी महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजहितासाठी हा कायदा अधिक कठोरपणे अंमलात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेच्या शेवटी त्यांनी सभागृहातील सदस्यांना आवाहन करताना सांगितले की, हा विषय महिलांच्या सन्मानाशी संबंधित असून, अशा चर्चेत संवेदनशीलता आणि जबाबदारी जपणे आवश्यक आहे, महिलांच्या अधिकारात काम करणारी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×