सायबर चोरट्यांना बँकखाते वापरण्यास देणारा अटकेत

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

पुणे सायबर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात सायबर चोरट्यांना स्वतःचे बँक खाते व्यवहारासाठी उपलब्ध करून देणार्‍याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. अरविंद बाबुलालजी लोढा (वय ५५, रा. टेल्को हाऊसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ७३ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगरमधील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पुण्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले – सविस्तर बातमी

गुंतवणूकीच्या आमिषाने सायबर चोरट्याने एकाची ७४ लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, सायबर पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात चोरट्यांनी फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी ३० लाख ८४ हजार रुपये निगडीतील एकाच्या बँके खात्यात जमा केले होते. चोरट्याने टप्याटप्याने १० व्यवहारांद्वारे ही रक्कम जमा केली होती. पोलिसांनी संबंधित खातेधारकाची माहिती घेतली. तेव्हा हे खाते सूरज ट्रेडलाईन नावाचे असून, हे खाते लोढा याचे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. निगडीतील हनुमान मंदिर परिसरात सापळा लावून पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतले. लोंढा याच्याकडून दोन मोबाइल आणि तीन डेबिट कार्ड जप्त केले.

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. दरदिवशी दोन ते तीन गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. सायबर चोरट्यांना फसवणुकीची रक्कम थेट स्वत:च्या खात्यात जमा करत नाही. त्यासाठी चोरटे पैशांचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्याचा वापर करीत असल्याचे याद्वारे उघडकीस आले आहे. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, संदेश कर्णे, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, प्रवीणसिंग राजपूत, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे, शीतल डांगे, आनंद भंडलकर, रवी राठोड यांनी केली.

नागरिकांनो आमिषाला बळी पडू नका

शहरात मागील काही दिवसांपासून सायबर चोरट्यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. तपास यंत्रणांकडून कारवाईची भीती दाखविणे, शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×