Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

माणगावात मोटार चालकाचा खून करुन पसार झालेले अटकेत

बाणेर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात एका मोटार चालकाचा खून करुन पसार झालेल्या तिघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मी विहार अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर), ओंकार विजय केंजळे (रा. पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी – सविस्तर बातमी

वाघमारे, पाटोळे, केंजळे यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका मोटार चालकाचा खून केला होता. खून करुन तिघे जण मोटार घेऊन पसार झाले होते. बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रीतम निकाळजे हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी वाघमारे ननावरे पुलाजवळ थांबला असून, तो मोटार विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती निकाळजे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ननावरेला पकडले. त्याच्या ताब्यातून मोटार जप्त करण्यात आली.

चौकशीत वाघमारे, साथीदार पाटोळे, केंजळे यांनी माणगाव परिसरात एका मोटार चालकाचा खून केल्याची कबुली दिली. माणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वाघमारेसह साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिरुमला रजनीकांत, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्य मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, प्रीतम निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतिरक यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×