Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Pune : शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी

येवलेवाडी अन मुंढव्यात ४६ लाखांची घरफोडी

३ लाखांचा ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड, कात्रजमधील आंबेगाव परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाचा दणका; २० वर्ष कारावासाची सुनावली शिक्षा – सविस्तर बातमी

कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे आंबेगावमधील जांभुळवाडी रस्त्यावर असलेल्या केंदुळकर निवास इमारतीत राहायला आहेत. चोरट्यांनी मंगळवारी (१३ जानेवारी) दुपारी घराचे कुलूप तोडून कपाटातील अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.

कोथरूडमधील आत्रेय सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वारजे भागात राहायला आहेत. त्यंचे आई-वडील आत्रेय सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी १२ जानेवारी रोजी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याची घटना घडली. पोलीस हवालदार माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×