Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणारा अटकेत

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी संजय जाधव (वय ५०, रा. खुटाळे वस्ती, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत ज्येष्ठ नागरिकाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय पीडित मुलीशी आरोपी जाधव हा गेल्या वर्षभरापासून अश्लील कृत्य करत होता. याप्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. घाबरलेल्या मुलीने याप्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. त्यानंतर आईने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

लोणीकंद भागात वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींनी मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×