Breking News
वादातून मोटार चालकाने दाम्पत्याला केली मारहाणपुण्यात दीड वर्षात शस्त्र परवान्याचे ४०४ अर्ज फेटाळलेतर थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारासिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो असं सांगून केली फसवणूक उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजनइंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनचांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनभरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावलेजीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडाविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन

ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्याला बेड्या

ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्याला बेड्या

खडकी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील खडकी परिसरात ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. दिनेश अमृतलाल जैन (वय २४, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पुण्यासह नाशिकमध्ये दागिने हिसकावणारी चोरट्यंची टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

ज्येष्ठ महिला २८ मे रोजी खडकीतील एलफिस्टन रस्त्यावरून निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी जैनने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते. ज्येष्ठ महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी एलफिस्टन रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तांत्रिक तपास, तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैनला पकडले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, संदेश निकाळजे, ऋषिकेश दिघे, प्रताप केदारी आणि पथकाने ही कामगिरी केली. जैन याने दागिने हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने पोलिसांकडे तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top