Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

बसची वाट पाहणाऱ्या महिलेची सोनखाखळी चोरणाऱ्याला बेड्या

बसची वाट पाहणाऱ्या महिलेची सोनखाखळी चोरणाऱ्याला बेड्या

हडपसर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर येथील पीएमटी बसथांब्यावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेची सोन साखळी हिसकावून पसार झालेल्‍या सराईत चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत राहुल नामदेव देडे (वय २१, रा. राजखुडे वस्ती, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला हडपसर येथील पीएमटी बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करत उभ्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने क्षणार्धात सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाची रोकड हिसकावली – सविस्तर बातमी 

घटनेनंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार महावीर लोंढे व अनिरुद्ध सोनवणे यांना राहुल देडे बद्दल माहिती मिळाली. तो गोसावी वस्तीतील राजखुडे वस्तीत राहत असल्याची खात्री पटताच आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. राहुल देडे याने सोनसाखळी चोरी केल्‍याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले ३५ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्‍त करण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील व पोलीस हवालदार निलेश किरवे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, बापू लोणकर, भाऊसाहेब कटके, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×