फरासखाना पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – दुकानात साहित्य खरेदीसाठी गेलेल्या तरूणाला मारहाण करीत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणार्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ७ मार्चला सकाळी अकराच्या सुमारास मंगळवार पेठेत घडली होती. अजय शेखर सुर्वे (वय २८ रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार पसार झाले आहेत.
हॉटेलला रिव्हिव्ह देण्याचा टास्क अंगलट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे केशवनगर मुंढवा परिसरात राहायला असून, ७ मार्चला सकाळच्या सुमारास मंगळवार पेठेतील दुकानात साहित्य आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अजय सुर्वे याच्यासह इतर तिघांनी तक्रारदाराला कारण नसताना मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तपास करीत आहेत.
























