Breking News
सफरचंदाच्या व्यापाऱ्याला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या कॉलजळगाव सुपे येथे १९ मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजनसराईत गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षाएसबीआय बँक मॅनेजर बोलतोय… सायबर चोरट्याने केली जेष्ठ महिलेची फसवणूकपुण्यातील दत्तवाडीत टोळक्याचा राडा, तरूणावर खूनी हल्लागोल्ड ट्रेडींगच्या नादात गमावले ४० लाख रूपयेकात्रजमध्ये रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला उडविले, टेम्पो चालक पसारमोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवला अन पत्नीचा गळा घोटून केली आत्महत्यापुण्यात ड्रोन उडवण्याला ३० दिवसांची बंदीतरुणाच्या डोक्यात दगड मारून खून करणारा लातूरमधून अटकेत

मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवला अन पत्नीचा गळा घोटून केली आत्महत्या

कर्जबाजारी झाल्यामुळे उचचले टोकाचे पाउल

marathinews24.com

पुणे – कर्जबाजारी झाल्यामुळे फळविक्रेत्या तरूणाने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १३ मे रोजी मांजरी खुर्द परिसरात घडली आहे. आत्महत्यापुर्वी संबंधित तरूणाने मोबाइलमध्ये व्हाईस रेकॉर्ड करून मी खूप कर्जबाजारी झालो आहे, पैशांची ताणाताण सुरू असल्याचे नमूद केले. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खून करीत स्वतः गळफास घेतला.

पुण्यात ड्रोन उडवण्याला ३० दिवसांची बंदी – सविस्तर बातमी

उज्वला नागनाथ वारूळे (वय ४० रा. मांजरी खुर्द, समर्थ डेव्हलपर्स मांजरी ता. हवेली ) असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. नागनाथ वसंत वारूळे (वय ४२ रा मांजरी खुर्द, दोघेही मूळ रा. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार वैजिनाथ केदार यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारूळे कुटूंबिय मूळचे तुळजापूरमधील असून, काही महिन्यांपासून मांजरी खुर्द परिसरात कामाला आले होते. त्यांना कामधंदा मिळत नसल्यामुळे दोघांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, नागनाथवर कर्ज झाल्यामुळे तो तणावग्रस्त झाला होता. त्याच ताणातून त्याने स्वतःच्या मोबाइलमध्ये व्हाइस रेकॉर्ड केला. माझ्यावर कर्ज खूप झाले, पैशांची ताणताणी झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने रेकॉर्डमध्ये नमूद केले. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. स्वतः बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला गळफास घेउन आत्महत्या केली. दरम्यान, सकाळच्या सुमारास परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकजण दोरीला लटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्‍यांसह वाघोली पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top