Breking News
स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबारघरफोडीप्रकरणी आरोपीला अटक, बंडगार्डन पोलिसांची कामगिरीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादनरिक्षावर झाड कोसळून प्रवाशी जेष्ठ महिला ठारनागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध – पोलीस आयुक्त अमितेश कुमारपुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाईशिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभपर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५ ’चे १ जून रोजी आयोजनबँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १२ लाखांचा गंडा

पीएमपीएल बसप्रवासात १ लाखांचे मंगळसूत्र चोरीला

पीएमपीएल बसप्रवासात १ लाखांचे मंगळसूत्र चोरीला

गाडीतळ बसस्थानक ते हडपसर प्रवासादरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २६ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास गाडीतळ बसस्थानक ते हडपसर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी हडपसरमधील ससाणेनगरमध्ये राहणार्‍या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

स्टॉक ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली २८ लाखांना – सविस्तर बातमी 

पुणे- स्टॉक ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २८ लाख ४० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ जानेवारी ते २४ एप्रिल २०२४ कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीत राहायला असून, ३१ जानेवारी २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. स्टॉक ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादित केला. खाते उघडण्यास भाग पाडून त्यांना किरकोळ स्वरूपात नफा ऑनलाईनरित्या वर्ग करून दिला.

त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास संपादित झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. तीन महिन्यांत जवळपास २८ लाख ४० हजारांची ऑनलाईन रक्कम गुुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताला फोन करून रक्कम माघारी देण्याची मागणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचा संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमधील ससाणेनगरमध्ये राहायला आहेत. २६ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास गाडीतळ ते हडपसर असा प्रवास करीत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी महिलेने हडपसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौजाळ तपास करीत आहेत.

बसप्रवासात ६० हजारांचे दागिने चोरीला

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगेतून सोन्याचे बिस्कीट आणि दागिने असा ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ मे रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास पुणे महानगरपालिका बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी नवी सांगवीत राहणार्‍या तरूणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हे नवी सांगवीत राहायला असून, २५ मे रोजी ते कामानिमित्त शिवाजीनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये सोन्याचे बिस्कीट आणि इतर दागिने होते. मात्र, बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधून ६० हजारांचे दागिने चोरून नेले. दरम्यान, दागिने चोरीची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हिरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top