प्रकरण दडपले गेल्याची पालकांमध्ये चर्चा..
marathinews24.com
जत – तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधित घटना जिल्हा परिषदेकडून संचालित आश्रमशाळेत घडली असून, याबाबत पालकांनी गंभीर तक्रार केली आहे. सदरील आश्रम शाळेत जत पूर्व भागातील अनेक मुली शिक्षण घेत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असून शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगला चोप दिल्याचेही चर्चा सुरू आहे. सध्या तरी पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा नोंद झाला नसून प्रकरण दाबल्याचे पालकांमध्ये चर्चा आहे. सदरील घटना ही अत्यंत गंभीर असून सध्या गावात चर्चेचा विषय ठरली आहे.
पूर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर केले कोयत्याने वार – सविस्तर बातमी
घटनेने तालुक्यात खळबळ उडवून दिली असून, सामाजिक संघटनांनी देखील याची दखल घेतली आहे. परंतु यापूर्वीही अशा घटना सदरील शाळेमध्ये घडली असून प्रकरण दाबल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
पालकांनी शाळा प्रशासनावर आरोप करत, आपली मुले सुरक्षित नसल्याचे सांगितले आहे. संबंधित संस्थेच्या वतीने यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, कोणत्याही कर्मचाऱ्याचा दोष सिद्ध झाला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकाराची सखोल चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास कठोर शिक्षा केली जाईल असे सांगितले.