कंपनीतून मशीनसह सव्वा तीन लाखांचे साहित्य लंपास
marathinews24.com
पुणे – कंपनीचा पत्रा उचकटून तिघांनी एका ब्लोअर मशीनसह ड्रील मशीन मिळून ३ लाख ३५ हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना २ ते ३ मे कालावधीत नांदेडफाटा परिसरातील संकल्प बंगलो लेनमध्ये लगड ट्रान्सपोर्टजवळ घडली आहे. याप्रकरणी संभाजी शंकर जमादार (वय २९ रा. सिंहगड रस्ता) अर्जुन साह (वय ३१) याच्यासह एकाविरूद्ध नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेशकुमार मिश्रा (वय ४८ रा. नांदेडफाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील महत्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडफाटा परिसरातील संकल्प बंगलो लेनमध्ये लगड ट्रान्सपोर्टजवळ संबंधित कंपनी आहे. आरोपी संभाजी जमादार आणि अर्जुन साह याच्यासोबत आणखी एकाने संगनमताने कंपनीचा पत्रा उचकला. आतमध्ये प्रवेश करून ब्लोअर मशीनसह ड्रील मशीन मिळून ३ लाख ३५ हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी माहिती मिळताच कंपनीने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करीत आहेत.