Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात एमडी ड्रग्जची विक्री रॅकेट उघडकीस

दोघांना पकडून ३१ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

marathinews24.com

पुणे – एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२, रा. विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बसच्या धडकेत तरूण ठार, पिसोळीतील घटना – सविस्तर बातमी

वाघोली पोलिस ठाण्याचे तपास पथक सातव वस्ती रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार प्रदीप मोटे, विशाल गायकवाड यांना पाहून एकजण घाईगडबडीत निघून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन योगेश कणगरे याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे १ लाख ८ हजार रुपयांचे ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) मिळून आले. पोलिसांनी त्याच्या कारसह एमडी जप्त करुन योगेश कणगरे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने एमडी पावडर ही त्याचा मित्र सोनू सिंहने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोनू सिंह याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ४७ हजार रुपयांची ८ ग्रॅम एमडी, दुचाकी, मोबाईल मिळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, पार्किंगमध्ये कारमिळून आली. तेव्हा कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांचे २३ ग्रॅम एमडी मिळून आले. पोलिसांनी ती २० लाखांची कार जप्त केली. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी ३७ ग्रॅम एमडी, मोबाईल, दोन कार आणि दुचाकी असा ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, एपीआय विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, राहुल कोळपे, पोलिस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×