Breking News
भारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाई

वारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखल

वारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी महिलेच्या अंगावर मांस- हाडाचा तुकडा फेकल्याचा धक्कादायक प्रकार २१ जूनला घडला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित महिला आरोपीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नसीम शेख अब्दुल ( वय ५७) महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अक्कलवंत रामराव राठोड (वय ४३, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डॉ. सबनीस यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले – शरद पवार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांची दिंडी 20 जूनला कॅम्प येथील गुरुद्वारामध्ये मुक्कामी होती. २१ जूनला सकाळी इस्कॉन मंदिरात दर्शन घेऊन आम्ही हडपसरकडे जात होतो. दुपारच्या सुमारास म्हंमादेवी चौकातील फुटपाथवरून जताना झोपडीत बसलेल्या शेख नावाच्या महिला आरोपीने दिंडीतील माया धुमाळ या महिलेच्या अंगावर हाडाचा लालसर तुकडा फेकला. त्यामुळे तिला जाब विचारला असता, तिने तक्रारदाराला शिवीगाळ केली. ‘तुला काय करायचं ते कर, मी कोणाला घाबरत नाही, असे धमकावले.

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे चाललेल्या दिंडीत सहभागी असलेल्या वारकरी महिलेच्या अंगावर म्हंमादेवी चौकात एका महिलेने हाडाचा लालसर तुकडा फेकल्याची घटना २१ जूनला घडली आहे. या प्रकारामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली असून संबंधित महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ही घटना वारकरी संप्रदायाच्या व हिंदू धर्माच्या भावना दुखावणारा आहे. त्यामुळे संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी फिर्यादीत केली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता, पोलिस तपास सुरु आहे. वारकऱ्यांनी शांतता राखत पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top