Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मुलबाळ होत नसल्याने परप्रांतीय दाम्पत्याने केले चिमुरड्याचे अपहरण

मुलबाळ होत नसल्याने परप्रांतीय दाम्पत्याने केले चिमुरड्याचे अपहरण

पंजाबमधून मुलाची सुटका, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – कामावर जाताना तीन वर्षीय मुलाला शेजार्‍यांकडे ठेउन जाणे कुटूंबियाच्या अंगलट आले आहे. संबंधित दाम्पत्याने मुलाचे अपहरण करीत थेट पंजाबमधील लुधियाना गाठले होते. मात्र, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. मुलबाळ होत नसल्यामुळे शेजारी राहणार्‍या महिलेच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दाम्पत्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना दिली आहे. अपहरणाची घटना १२ सप्टेंबरला रांजणगाव परिसरात घडली होती. १७ सप्टेंबरला आरोपींना अटक केली आहे.

पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव (वय ३७) आणि अर्जुनकुमार वकीलकुमार यादव (वय ३६ दोन्ही रा. लोआलगान, चौसा, मधेपुरा, बिहार) यांना अटक केली आहे. आयुष महेंद्र पडघाण (वय ३ ) असे सुखरूप सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे.

मोटारींच्या काचा फोडून रोकडसह लॅपटॉप चोरीला – सविस्तर बातमी 

रांजणगाव एमआयडीसी औद्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार कामानिमित्ताने राहायला आहेत. कारेगावमधील कारेगाव काजल महेंद्र पडघाण (मुळ रा.जुमडा,ता.जि. वाशिम) या त्यांचा भाऊ प्रमोद पाटील, मुलगा आयुषसह राहायला आहेत. त्यांच्या इमारतीत परप्रांतीय दाम्पत्य यादव ८ ते १० हे महिन्यांपासून राहायला होते. त्यामुळे काजल आणि त्यांचा भाऊ हे कंपनीमध्ये कामाला जाताना मुलगा आयुषला शेजारी राहणार्‍या यादव दाम्पत्याकडे खेळण्यासाठी ठेउन जात होते. दि.१२ सप्टेंबरला काजलने मुलगा आयुषला यादवकडे ठेवले होते. मात्र, कामावरून आल्यानंतर संबंधित दाम्पत्य घर बंद करून निघून गेले होते.

परप्रांतीय दाम्पत्य यादव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद होते. कोमल आणि तिच्या भावाने यादव दाम्पत्याचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. तसेच ते मुलाला घेवुन परत येतील असे वाटल्याने त्यांची दोन दिवस वाट पाहिली. मात्र, ते माघारी न आल्यामुळे काजलने १५ सप्टेंबरला यादव दाम्पत्याने मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपींची शोध मोहिम राबवून त्यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी यादव दाम्पत्य हे पंजाब राज्यातील लुधीयाना येथे पोहचल्याचे निष्पन्न झाले.

रांजणगाव पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ पंजाबमध्ये धाव घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने यादव दाम्पत्याला ताब्यात घेत १७ सप्टेंबरला अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षीय मुलाची सुटका केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, एसडीपीओ प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल उपनिरीक्षक अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय सरजिने, संकेत जाधव, पंजाब लुधीयाना गुरमित सिंग यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×