Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा घायवळच्या भावावर वरदहस्त

निलेश घायवळ

थेट शस्त्र परवान्यासाठी दिले शिफारस पत्र

marathinews24.com

पुणे – दहशतीच्या जोरावर अमाप संपत्ती गोळा करणारा आणि मोक्का गुन्ह्यात पसार असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या सख्ख्या भावाच्या शस्त्र परवान्यासाठी चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात यावा अशी शिफारस पुणे पोलिसांकडे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे गृहमंत्री देवा भाऊच्या राज्यात गुन्हेगारांना थेट शस्त्र परवाना देताना सर्व गुन्ह्याची माफी दिली जात आहे का असा सवाल आता पुणेकरांनी विचारला आहे.

गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ कोथरुडमध्ये राहायला आहे. यापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः च्या स्वाक्षरीने सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी पोलिसांकडे शिफारस केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कदम यांच्या सहीच्या पत्रात सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याची शिफारस पुणे पोलिसांकडे केली. विशेष म्हणजे यापूर्वी सचिन घायवळ याच्याविरुद्धही आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल आहे. सचिन घायवळ याला २० जूनला शस्त्र परवाना देण्यात आला होता. मात्र, त्याला शस्त्र परवाना देण्यास पोलिसांचा विरोध होता. पण विरोध डावलून त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. सचिन याच्यावरही गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला परवाना देताना थेट गृहराज्यमंत्री कदम यांनीच शिफारस केल्यामुळे शस्त्र परवाना देताना पुणे पोलिसांचा नाईलाज झाला होता.

काय उल्लेख आहे शस्त्र परवाना प्रतमध्ये

गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला दिलेल्या शस्त्र परवान्याच्या प्रतमध्ये योगेश कदम यांनी स्वत: आदेश दिले आहेत. आपल्याला राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकाऱ्याद्वारे आपण शक्तीचा वापर करुन याबाबतचे आदेश देत असल्याचे गृहराज्यमंत्री कदम यांनी संबंधित प्रतमध्ये नमूद केले आहे.

म्हणुन कुख्यात गुंड निलेश घायवळ आला पोलिसांच्या रडारवर

कोथरूड परिसरात किरकोळ कारणावरून तरूणावर गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरूद्ध कोथरूड पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केला. त्यानंतर गुन्हा दाखल होताच घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविलेल्या पासपोर्टद्वारे स्विर्त्झलंड गाठले आहे. त्याठिकाणी राहण्यासाठी त्याला ९० दिवसांचा व्हिजा मिळाला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्ट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे.

वादावादीतून सराईत निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी तरुणावर गोळीबार केला. हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर काही अंतरावर टोळीने एकावर वार केल्याची घटना १७ सप्टेंबरला कोथरूडमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी घायवळ टोळीतील मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करीत त्यांची धिंडही काढली. याप्रकरणात कुख्यात नीलेश घायवळ याच्याविरूद्ध मोक्का गुन्हा दाखल होताच, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगरमधून मिळवलेल्या पासपोर्टचा आधार घेतला. त्याने पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी थेट स्विझरलँड गाठले आहे. त्यामुळे घायवळ हा पुणे पोलिसांच्या रडारवर आला असून, आतापर्यंत घायवळविरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात रुतला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×