येरवड्यातील निरीक्षगृहात अल्पवयीनाला मारहाण

पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून रोकड चोरली

सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालकांच्या निरीक्षण गृहात एका अल्पवयीनाला पाईपने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी निरीक्षण गृहातील सुरक्षा रक्षकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिमोन सुरेश साबळे (वय ४२) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला नोटीस बजाविण्यात आली आहे.

पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र आहे. या केंद्रात गंभीर, तसेच किरकोळ गुन्हे करणाऱ्या अल्पवयीनांना बाल न्याय मंडळाच्या आदेशाने ठेवण्यात येते. अल्पवयीनांचे समुपदेशन या केंद्रात केले जाते. निरीक्षण गृहातील एका अल्पववयीनाची भांडणे झाली होती. त्याने एका अल्पवयीनाला मारहाण केली होती. त्यानंतर निरीक्षण गृहातील सुरक्षा रक्षकाने अल्पवयीनाला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर साबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सत्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×