ससूनमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसुती; तरुणावर गुन्हा दाखल

- पोलीस, डाॅक्टरांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा

पोलीस, डाॅक्टरांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन ती गर्भवती झाल्यानंतर ससून रुग्णालयात तिची प्रसृती करण्यात आली. नागपूर महापालिकेचा बनावट जन्मदाखला सादर करुन पोलीस आणि डाॅक्टरांची दिशाभूल, मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

गुन्हा दाखल झालेल्या २५ वर्षीय तरुणाचे एका १५ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असताना त्याने तिच्यावर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. मुलगी सज्ञान असल्याचा बनावट दाखल आरोपींनी तयार केला. नागपूर महापालिकेच्या नावे तयार केलेला बनावट जन्मदाखला मुलीची आई आणि आरोपी तरुणाने ससून रुग्णलयात सादर केला. त्यानंतर मुलगी प्रसृत झाली. आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो), पोलीस आणि डाॅक्टरांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×