Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अधिकारी भोसले यांनी केलेला कौशल्यपूर्ण तपास आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद निर्णायक ठरला

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत लैिंगक अत्याचार करणार्‍या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरीसह १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गोमाजी राम गायकवाड (वय ३६, रा. घोरपडी, पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले यांनी अतिशय बारकाईने तपास केला. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यात दलित विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू – सविस्तर बातमी 

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या ९ वर्षीय मुलीचा विनयभंग व अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासी महिला अधिकारी अश्विनी पाटील यांनी पीडित अल्पवयीन मुलीला विश्वासात घेउन बारकाईने तपास केला. त्याअनुषंगाने ठोस पुराव्यांसह वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. त्याचआधारे पुणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी गोमाजी गायकवाड याला पाच वर्षे सक्तमजुरीसह १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

प्रकरणाचा अतिशय गांभीर्याने तपास करीत पोलीस अधिकारी पाटील यांनी पुराव्यांची साखळी तयार केली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतरही सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाला सहकार्य केले. त्यामुळे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. जोशी ( पुणे) यांच्या न्यायालयाने ८ जानेवारी २०२६ रोजी आरोपी गायकवाड याला सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. खटल्यात तपासी अधिकारी भोसले यांनी केलेला कौशल्यपूर्ण तपास आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद निर्णायक ठरला. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील नितिन कोंघे यांनी युक्तिवाद केला. आरोपी गायकवाडला कलम ३५४, ३५४ अ, ५०६ ८,१२ अन्वये दोषी ठरवले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×