Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

येरवड्यात निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यावर अल्पवयीनांकडून हल्ला

शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर हल्ला

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील कर्मचाऱ्यावर अल्पवयीनांनी हल्ला केल्याची घटना घडली. मारहाणीत निरीक्षण गृहातील कर्मचारी गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष किसन कुंभार (वय ५०, रा. नंदादीप सोसायटी, चऱ्होली फाटा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंभार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील 3 हजार 600 कोंटीच्‍या ड्रग प्रकरणात सुत्रधाराचे प्रत्‍यारोपण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पं. जवाहराल नेहरु उद्योग केंद्रात (मुलांचे शासकीय निरीक्षणगृह) कुंभार हे कर्मचारी आहेत. रविवारी (१६ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास ते निरीक्षणगृहातील अल्पवयीनांना नाश्ता वाटत होते. त्या वेळी किरकोळ वादातून निरीक्षणगृहातील तीन अल्पवयीनांनी कुंभार यांना मारहाण केली. मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक देठे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×