Breking News
Pune Online Fraud News : ‘टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट वेबसाइटPune Theft News : मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपासKharadi Crime News : दारुच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलKasba Peth Crime News : पुण्यात कसबा पेठ, बुधवार पेठ, गुलटेकडीत पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावलेPune Gold Chain Snatching : तरुणीची तीन लाखांची सोनसाखळी हिसकावलीMukhyamantri Matsya Sampada Yojana : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजना व मासेमारी परवाना सेवा आता पूर्णपणे ऑनलाईनShare Trading Scam Pune : शेअर ट्रेडिंगमधून परताव्याचे आमिष; २५ लाखांची फसवणूकPune Cyber Crime News : पेन्शन कार्डच्या जाहिरातीद्वारे ४ लाख ८५ हजारांची फसवणूकVeer Baburao Shedmake History : आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके – डॉ.अशोक उईके, आदिवासी विकास, मंत्रीPune Municipal Corporation Bomb Threat : पुणे महापालिकेला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल; परिसरात खळबळ

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; रीलस्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे, तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याप्रकरणी स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ३० मार्चला पुण्यातील टिळक रस्त्यावर घडली आहे.

पुण्यात गंगाधाम चौकात गादी कारखान्याला भीषण आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी टिळक रस्त्यावरील एसपी महाविद्यालयाजवळ एका संघटनेकडून आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी पत्रकार तरुणी आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी त्याठिकाणी गेल्या होत्या. वार्तांकन सुरू असतानाच रीलस्टार संतोष पंडित याने त्याठिकाणी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त केला. अर्वाच्य भाषेत बोलून त्याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली. तिच्याकडे अपमानास्पद नजरेने पाहत अश्लील हावभाव केले. त्याने मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या इतर महिलांकडेही संतोष पंडितने शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अंतर्गत पंडित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहे. घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×