Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

एपीके फाईलद्वारे घेतला मोबाइलचा ताबा

एपीके फाईलद्वारे घेतला मोबाइलचा ताबा

तरूणाला १० लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी तरूणाच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठवून उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तरूणाच्या मोबाइलचा ताबा ऑनलाईनरित्या घेउन तब्बल १० लाख रूपये वर्ग करून घेतले आहे. ही घटना १४ ते १५ नोव्हेंबर २०२५ कालावधीत लोहगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरूणाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व वापरकर्ते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसासाठी महिलेचा छळ; बाळासह घराबाहेर काढत लाथा बुक्क्यानी केली मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण लोहगावमध्ये राहायला असून, १४ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठविली. संबंधित फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाच्या मोबाइलचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांच्या बँकखात्यातून तब्बल १० लाख रूपये इतर बँकखात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×