Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

कुख्यात गुंड नीलेश घायवळविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

बीड पंचायत समितीमध्ये राडा

महिला व्यावसायिकाला धमकावून ४५ लाखांची खंडणी प्रकरण

marathinews24.com

पुणे – महिला व्यावसायिकाला धमकावून ४५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून परदेशात गेलेला घायवळ याच्या विरुद्ध कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत. घायवळविरुद्ध आतापर्यंत वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

कात्रज घाटात वाहनाच्या धडकीत तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

‘कोथरूड गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाला धमकावून सदनिकांचा ताबा घेणे, तसेच महिला व्यावसायिकाला खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मकोका) कारवाई केली आहे. आतापर्यंत घायवळविरुद्ध मकोका कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल झाले आहेत’, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

घायवळच्या संपत्तीबाबत पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घायवळच्या संपत्तीची चौकशी करण्याबाबत पुणे पोलिसांकडून अंमलबजावणी संचानालयाशी (ईडी) पत्रव्यवहार करण्यात आला आहे. घायवळ सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून तो परदेशात गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.

घायवळ टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड, सातारा, पुणे जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे. घायवळ टोळीने जमीन बळाकविण्याचे गुन्हे केले आहेत. बेकायदा मार्गाने त्याने संपत्ती जमा केली आहे. घायवळच्या संपत्तीची तपासणी करण्यात यावी, याबाबत पुणे पोलिसांनी ‘ईडी’ला पत्र पाठविले आहे.

घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी सचिन, नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. शाळेतील उपाहारगृहासाठी खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या एका महिलेला धमकावून तिच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी घायवळ याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घायवळ सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून पत्रव्यहार करण्यात आला आहे. याबाबत आंतराष्ट्रीय पोलीस संघटनेशी (इंटरपोल) संपर्क साधण्यात आला आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी ब्लू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे घायवळने अहिल्यानगर ग्रामीण पाेलीस दलातील अहमदनगर विभागातून बनावट कागदपत्रे सादर केली.

‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाने बनावट कागदपत्रे सादर करून २०१९ मध्ये घायवळने पारपत्र मिळवले. अहमदपूर पोलिसांनी पारपत्र पडताळणी (पासपोर्ट व्हेरिफिकेशन) केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×