मॉलसह गर्दीच्या ठिकाणी संकटसदृश्य प्रात्यक्षिकांची होणार उजळणी
marathinews24.com
पुणे – जम्मू कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानकडूनही कठोर पाउले उचलली जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशनानुसार ७ मे रोजी विविध राज्यात स्वसंरक्षणार्थ मॉकड्रील होणार आहे. महाराष्ट्रातील निवडलेल्या शहरांपैकी पुण्यातही बुधवारी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून मॉकड्रील केले जाणार आहे. प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणांसह मॉलनजीक हा संकटसदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सराव केला जाणार आहे. दरम्यान, यावेळी नागरिकांनी घाबरून जाउ नये, असे आवाहन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.
पुण्यात सायबर चोरट्यांकडून तरुणाची पाहुणे पाच लाखाची फसवणूक – सविस्तर बातमी
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यानंतर नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ सामोरे जाण्यासाठी तयारीचा भाग म्हणून देशभरातील २५९ जिल्ह्यात मॉकड्रील केले जाणार आहे. यामध्ये विविध तपास यंत्रणा सहभागी होणार असून, संबंधित यंत्रणांकडून त्या-त्या ठिकाणी सायरन वाजविणे, ब्लॅकआउट करणे, वीज खंडीत केली जाणार आहे. त्यासोबतच प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी नागरिकांची तयारी कशी असावी, याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अख्यारित असलेल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून मॉकड्रील केले जाणार आहे. गर्दीची ठिकाणे, बसस्थानक, रेल्वे स्थानकासह मॉलजवळ प्रात्यक्षिके केली जाणार असून, त्याठिकाणी असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
नागरिकांनी घाबरू नये, ठिकठिकाणी मॉकड्रील-पुणे पोलीस
महत्वाच्या ठिकाणांवर पोलिसांकडून मॉकड्रील सुरू असताना नागरिकांनी घाबरू नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेउ नये. मॉकड्रीलदरम्यान स्वसंरक्षणार्थ विविध अॅक्टीव्हिटी केली जाणार आहेत. अग्निशमक दल, पोलीस, स्थानिक यंत्रणाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळासह राज्य शासन आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसारच मॉकड्रील केले जाणार आहे. प्रामुख्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी कशी घ्यायची, याचेही धडे दिले जाणार आहे.
केंद्र शासनासह राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत हद्दीत मॉकड्रील केले जाणार आहे. प्रामुख्याने गर्दीची ठिकाणे, मॉलनजीक हे प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. यावेळी नागरिकांनी घाबरून जाउ नये, अफवांवर विश्वास ठेउ नये. पुणे पोलीस दल आपल्या संरक्षणासाठी सदैव दक्ष आहे. – रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर