अमिताभ गुप्ता यांच्या कामांची आजही वाहवा, सिव्हिल सर्व्हिस डे निमित्ताने विशेष लेख
marathinews24.com
पुणे – पुण्यातील सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्का कारवाई, दादागिरीविरूद्ध एमपीडीएचा प्रभावी वापर करीत शहरात शांतता प्रस्थापित करणारे तत्कालीन पोलीस आयुक्त ते प्रशासकीय बदलीनंतर पुन्हा कारागृहातील गुन्हेगारांना वठणीवर आणून त्यांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल करण्यासाठी त्यांनी केलेले काम आजही कौतुकास्पद ठरत आहेत. मोक्कामॅन ते राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांसाठी नाविण्यपुर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करणारे सध्या आयटीबीपीमध्ये पोलीस महानिरीक्षक (आयजी) पदावर कार्यरत अमिताभ गुप्ता आजही त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आहेत.
सराईत टोळ्यांनी पुण्यातील नागरिकांचे जगणे नकोसे केले होते. अशा स्थितीत दाद मागायची तरी कोणाकडे म्हणत अनेक व्यापारी, उद्योजक, स्थानिक दुकानदारांनी मुक गिळून बसणे पसंत केले होते. दरम्यानच्या काळात सरकारने पुणे पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती केली. कोणाचाही मुलाहिजा ठेउ नका, टोळ्यांसह सराईतांना आठवणीत राहील अशी कारवाई करा, अशीच संमती शासनाने त्यांना दिली होती. त्यानुसार पदभार स्वीकारताच गुप्ता यांनी सराईत गुन्हेगारांविरूद्ध मोकास्त्र उगारत टोळ्यांचा सुफडा साफ करायला आरंभ केला. पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना मार्गदर्शन करणे, टोळ्यांसह सराईतांविरूद्ध कारवाईचा निर्णय घेणे, मोक्काचे दणादण प्रस्ताव पारित करणे, पोलिस कर्मचार्यांसह अधिकार्यांनी कामाची पद्धत बदलल्याने नागरिकांना फायदा झाला.
जेलमध्ये कैद्यांना अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत – सविस्तर बातमी
सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करीत गुन्हेगारांविरूद्ध दमबाजीला मोठा प्रतिसाद मिळाला. येरवडा किंवा शहर सोडा हे सोशल कॅम्पेन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. दहशतीसाठी व्हॉटसअॅप स्टेटस ठेवणे, दादागिरी-भाईगिरी करणारे गुन्हेगारीपासून स्वतःहून परावृत्त झाले. ट्वीटर, इन्स्टाग्रामवर पुणे पोलिसांचे त्यावेळेस तब्बल अडीच लाख फॉलोवर वाढले होते. दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त म्हणून तब्बल सव्वा दोन वर्षे काम करताना त्यांनी फक्त ३६ तास सुटी घेतली होती. सोशल मीडियावरील नकारात्मक टीका नोंदवून माहिती घेणे, महिला सुरक्षितता, शालेय आणि महाविद्यालयीन मुलींची सुरक्षितता, सायबर फसवणूकीचा प्रत्येक ठाण्यातंर्गत तपास, मोक्कापेक्षा एमपीडीएनुसार कारवाईचे आव्हान, नागरिकांमधील विश्वासार्हता वाढविण्यासाठी काम केले.
इ-मुलाखत ते स्मार्ट कार्ड योजना, बंदीवानांचे आवडते अधिकारी
राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंद्यासाठी इ-मुलाखत ते स्मार्टकार्ड उपक्रमाद्वारे अवघ्या दीड वर्षांच्या कारकिर्दीत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी नाविण्यपुर्ण उपक्रमांचा ठसा उमटविला होता. त्यामुळे ते बंदीवानांचे सर्वात आवडते अधिकारी म्हणून चर्चेत असून, बंदीवानासाठी राबविलेल्या विशेष योजनांमुळे असंख्य बंद्यांना त्याचा लाभ झाला आहे. कागदोपत्री अडथळ्यात अडकलेल्या योजनांना गती दिल्यास त्याचा फायदा बंद्यांना होउ शकतो, याची जाणीव होताच पदभार घेतल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच अमिताभ गुप्ता यांनी कामाचा झपाटा सुरू केला होता. कारागृहातंर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा, शिक्षणासाठी प्रोत्साहन, गळाभेट उपक्रम, महिला बंदीवानांच्या मुलांसाठी नन्हे कदम पाळणाघर, कम्युनिटी रेडिओ, अंघोळीसाठी गरम पाणी, प्रस्तावित वाढीव वेतन, स्मार्टकार्ड फोन, येरवडा कारागृहाच्या सुरक्षिततेसह योजना सुरू केल्या आहेत. बंदीवानांच्या जीवनात आमुलाग्र बदल करण्यासाठी त्यांनी दीड वर्षांत प्रचंड काम केले आहे. विशेषतः बंद्याच्या आरोग्याची काळजी, सकस अन्न, वस्त्र आणि निवारासारख्या भौतिक गरजा पुरविण्यापासून ते कारागृहातंर्गत सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कौतुकास पात्र ठरले होते.
बंद्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, झोपण्यासाठी अंथरूण
अंघोळीसाठी गरम पाणी, जेष्ठ वैâद्यांना झोपण्यासाठी स्वखर्चाने अंथरुण-पांघरुन, ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंगची सुविधा, नन्हे कदम यासारख्या नाविण्यपुर्ण योजना विविध कारागृहात राबविल्या. त्याला वैâद्यांसह नातलगांनी उपक्रमाला चांगलीच दाद दिली होती. वयोवृद्ध बंद्यांना शेतीतील हलकी कामे देणे, पॅरोल व फरलो रजेच्या नियमांमध्ये बदल केले. १९ महिन्यातच अमिताभ गुप्ता यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची वाहवा झाली होती. राज्यातील कारागृहांतील अंतर्गत व बाह्य रुपडे पालटविण्यासाठी त्यांनी विशेष प्राधान्य दिले होते. अलीकडच्या काळात गरीब बंद्यांना नातलगांसाठी बोलण्याची उणीवही त्यांनी जादा टेलिफोनची सुविधेद्वारे भरून काढली आहे. तर महिला बंदीवानांसाठी अनोखे उपक्रम, दैनंदिन वेतनवाढीचा प्रस्ताव, येरवडा कारागृहातर्गत सुरक्षितता, पॅनिक बटन, इ-प्रिझन द्वारे डेटाची संकलीकरणाला गती दिली होती.
गरिब बंदीसाठी ठरले देवदूत
आर्थिंक परिस्थितीमुळे घरी न जाणार्या विविध जिल्ह्यातील गरीब बंद्यांना व्हिडिओ कॉलद्वारे नातलगांसोबत संवाद साधण्याचे दिव्य पार पाडले. इ- प्रिझन प्रणालींतर्गत इ- मुलाखत विभागात संबंधित नातलगांकडून व्हिडिओ कॉलिंगसाठी वेळ निश्चीत केली. कारागृह प्रशासनाकडून त्याची माहितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित बंदीवानांच्या नातलगांना लिंक पाठवून व्हिडिओ कॉलिंग सुसंवाद घडविला राज्यभरातील कारागृहातंर्गत सोयी-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रीत करून बंद्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. बंदीवानांच्या भौतिक गरजा पुर्ण करणे, शैक्षणिक आवड जपणे, महिलांसह जेष्ठ बंदीवानांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.
सर्वसामान्यांच्या कौतुकास पात्र ठरले
बंदीवानांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, त्यांच्या भौतिक गरजा पुर्ण करता याव्यात, यासाठी तत्कालीन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी नाविण्यपुर्ण उपक्रमांचा धडाका लावला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या कारागृह विभागाला नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली. अनेक योजनांद्वारे होणारे बदल बंदीवानांसाठी फायदेशीर ठरले आहेत. सकस अन्न, वस्त्र आणि निवारासारख्या भौतिक गरजा पुरविण्यापासून ते कारागृहातंर्गत सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही सर्वसामान्यांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. नातलगांसोबत बोलण्यासाठी जादा टेलिफोनची सुविधा, महिला बंदीवानांसाठी अनोखे उपक्रम, दैनंदिन वेतनवाढीचा प्रस्ताव, कारागृहातंर्गत सुरक्षितता, पॅनिक बटन, इ-प्रीझनद्वारे डेटाची संकलीकरणाला गती दिली होती.
परदेशी बंदीवानांचीही घेतली काळजी
परदेशी वैâद्यांना त्यांच्या कुटूंबियासोबत सुसंवाद साधता यावा, यासाठी इ-प्रीजन प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध केली होती. त्याशिवाय आर्थिंक परिस्थितीमुळे घरी न जाणार्या विविध जिल्ह्यातील गरीब वैâद्यांनाही व्हिडिओ कॉलद्वारे नातलगांसोबत संवाद साधता आला. ऑनलाईनरित्या संबंधितांची नोंदणी करुन इ- मुलाखती सुरु करण्यात आली आहे. इ- प्रिझन प्रणालींतर्गत इ- मुलाखत विभागात संबंधित नातलगांकडून व्हिडिओ कॉलिंगसाठी वेळ निश्चीत केली जात आहे. कारागृह प्रशासनाकडून त्याची माहितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित बंदीवानांच्या नातलगांना लिंक पाठवून व्हिडिओ कॉलिंग सुसंवाद घडविला जात आहे.
शासनाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीने पालन करणे आमच्यासाठी क्रमप्राप्त असते. त्याचदृष्टीकोनातून कामावरही लक्ष केंद्रीत करीत निणर्यांची अमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले होते. पुणे पोलीस आयुक्त, कारागृह विभाग अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षकपदी काम करताना अनेक नाविण्यपुर्ण योजनांची अमलबजावणी केली. त्याचा फायदा अनेकांना झाला आहे. विशेषतः लोकाभिमुख काम करून संबंधितांना मदत करण्याची आमच्या खात्याची भूमिका आहे. त्याचपद्धतीने काम करीत पुढे मार्गक्रमण केले जात आहे. – अमिताभ गुप्ता, पोलिस महानिरीक्षक, आयटीबीपी