Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोशी दुर्घटना : बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

मोशी दुर्घटना : बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या तातडीच्या सूचना

marathinews24.com

पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी कचरा डेपो येथे सुरू असलेल्या बांधकामादरम्यान डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच अन्य बचाव पथके घटनास्थळी दाखल होऊन बचाव व मदतकार्य सुरू केले आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांची भरपावसात कामगिरी – सविस्तर बातमी 

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी तसेच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या.

दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच जखमींवर तातडीने आणि प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×