अपघाताच्या बतावणीने मोटार चालकाला लुटले

अपघाताच्या बतावणीने मोटार चालकाला लुटले

किरकटवाडी पुलाजवळील घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीच्या धडकेमुळे नुकसान झाल्याची बतावणी करीत चौघाजणांच्या टोळक्याने वाहन चालकाच्या गळ्यातील ३ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना १४ डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास किरकटवाडीजवळील पुलावर घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड परिसरात राहणार्‍या नागरिकाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोलीजवळील बकोरी गावात घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात राहायला असून, १४ डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोटारीतून घरी जात होते. त्यावेळी किरकटवाडी परिसरातील पुलाजवळ दुसर्‍या मोटारीतील चौघांनी त्यांना अडवले. तुमच्या गाडीमुळे आमच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यांना दमदाटी करून टोळक्याने तक्रारदाराच्या गळ्यातील ३ लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करीत आहेत.

अपघाताच्या बतावणीने लुटमारीच्या घटना

शहरातील विविध भागात अपघाताच्या बतावणीने लुटमारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. प्रामुख्याने उपनगरासह निमर्नुष्य रस्त्यावर मोटार चालकासह दुचाकीस्वाराला अडवून शिवीगाळ केली जाते. तुझ्यामुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे. अशी बतावणी करीत त्यांच्याकडील ऐवज लुटून नेला जात आहे. विशेषतः मोटार चालकांना अडवून लुटीच्या घटनांमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×