Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान व इन-विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाच्या संयुक्त अंमलबजावणीसाठी महापशुधन एक्सपोमध्ये सामंजस्य करार

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान व इन-विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाच्या संयुक्त अंमलबजावणीसाठी महापशुधन एक्सपोमध्ये सामंजस्य करार

देशी गोवंश संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस चालना मिळण्यास मदत

marathinews24.com

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानासाठी ‘महापशुधन एक्सपो’ परळी वैजनाथ येथे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली आहे. यावेळी पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंंजय मुंडे आदी उपस्थित होते.

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान – सविस्तर बातमी 

माने म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान व इन-विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाच्या संयुक्त अंमलबजावणीसाठी हा करार करण्यात आला, यामुळे राज्यातील देशी गोवंश संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस चालना मिळण्यास मदत होणार आहे.

कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गोवंश संवर्धन व सुधारणा कार्यक्रमांतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च वंशावळीच्या व जास्त दूध उत्पादन देणाऱ्या देशी गायी निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रावर १०० पेक्षा अधिक उच्च वंशावळीच्या देशी गाईंच्या कालवडींचा यशस्वी जन्म झाला असून, हा उपक्रम राज्यातील पशुधन विकासासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ‘ईटी-आयव्हीएफ’ प्रयोगशाळेद्वारे राज्यभरात देशी गाईंच्या उच्च वंशावळीच्या कालवडी तयार केल्या जात आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत सहीवाल, गिर, राठी, रेडसिंधी व थारपारकर तसेच खिल्लार व डांगी या दुधाळ देशी जातींच्या उच्च जनुकीय क्षमतेच्या कालवडी शेतकऱ्यांच्या बांधावरच तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गाईंची दूध उत्पादकता वाढविण्यास थेट मदत होणार असून दुग्धव्यवसाय अधिक लाभदायक होणार आहे.

या करारानुसार शेतकऱ्यांच्या संकरित गायींमध्ये उच्च प्रतीचे देशी गाईंचे भ्रूण प्रत्यारोपित करून यशस्वी गर्भधारणा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्राप्तकर्त्या गायींची निवड, समन्वय, प्रत्यारोपणानंतर गर्भधारणा तपासणी व नोंद व्यवस्थापन ही जबाबदारी विद्यापीठाकडे राहील, तर उच्च प्रतीचे भ्रूण उपलब्ध करून देणे, ओपीयु-आयव्हीएफ प्रक्रिया व तांत्रिक अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत केली जाणार आहे.

या करार प्रक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे तसेच मा. अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, डॉ. शितलकुमार मुकणे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पाची अंमलबजावणी देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, सहशास्त्रज्ञ डॉ. विष्णु नरवडे व भ्रूण प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विष्णु जवने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

या संयुक्त उपक्रमामुळे महाराष्ट्रात देशी गोवंश संवर्धन, जनुकीय सुधारणा व दूध उत्पादन वाढीस मोठी चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार असल्याचा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×