Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी सरकारची सकारात्मक भूमिका

marathinews24.com

पुणे – पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे व त्यांची कन्या आसावरी जगदाळे यांच्यासमवेत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आसावरी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट – सविस्तर बातमी 

एकनाथ शिंदे व चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेत तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्रीकर परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. दोघांनीही या विषयात तत्परतेने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याबद्दल जगदाळे कुटुंबीय व मेधा कुलकर्णी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्यावर पहलगाम येथे केवळ हिंदू असल्यामुळे झालेला हल्ला ही अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी घटना होती. त्या दुःखद प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नेत्यांनी आसावरी यांना शासकीय सेवेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला दहा महिने उलटल्यानंतर या विषयाची तातडीने दखल घ्यावी यासाठी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, तसेच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या प्रकरणाला आता गती मिळताना दिसत असून, ही दिलासा देणारी बाब आहे.

श्रीमती प्रगती आणि त्यांची कन्या आसावरी यांना दिलेले आश्वासन सरकार लवकरात लवकर पूर्ण करेल, असा मनापासून विश्वास आहे. कारण हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून न्याय, संवेदना आणि सामाजिक जबाबदारी यांचा विषय आहे. आसावरी उच्चशिक्षित असून, एमबीए केलेले आहे. त्यामुळे महानगरपालिकेत तिला प्रशासकीय पदावर किंवा वर्ग दोन श्रेणीतील नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे, असेही प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×