Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

युद्ध स्थितीमुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा मदतीचा हात

दुबई–इराणमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मदत कक्ष सक्रिय

marathinews24.com

पुणे – सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक नागरिक दुबई आणि इराण यासारख्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे हॉटेलमध्ये मुक्काम वाढवावा लागत असून, खर्च व इतर व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय व विमान वाहतूक विभागाने नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी व्यापक स्तरावर तयारी सुरू केली आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये विद्यार्थी, पर्यटक तसेच इतर नागरिकांचा समावेश असून त्यांना आवश्यक मदत मिळावी यासाठी समन्वय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

दरम्यान, परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवा व सुविधा संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मदतीसाठी ९४२२०३७३०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×