Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

गावठी दारू विक्रेत्याविरुद्ध एमपीडीए कारवाई

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

नाशिक कारागृहात स्थानबद्ध

marathinews24.com

पुणे – शहरातील पाषाण येथील लमाण तांडा व परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करुन विक्री करणारया सराइताविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानबद्धतेची कारवाई केली. या कारवाईनंतर गावठी दारु विक्रेत्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाचे अपहरणन करून खून – सविस्तर बातमी

थावरिया वाल्या पातलावत (वय ५३, रा. लमाण तांडा, पाषाण, असे कारवाई करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. पातलावत हा पाषाण परिसरात गावठी दारु तयार करुन विक्री करत होता. गावठी दारुच्या सेवनामुळे गंभीर स्वरुपाचे विकार, तसेच जिवीतहानीसारखे प्रकार घडण्याची शक्यता होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी पातलावत याच्याविरुद्ध कारवाई केली होती. गावठी दारु विक्री प्रकणी त्याच्याविरुद्ध यापूर्वी सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले होते. त्यानंतरही तो गावठी दारु तयार करून विक्री करत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मर्गदर्शनाखाली आरोपाविरूध्द झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये ((एमपीडीए) प्रस्ताव तयार करण्यात आला. संबंधित प्रस्ताव गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यामार्फत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. पोलीस आयुक्तांनी त्याला मान्यता दिली. त्यानूसार त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक किरण पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×