Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा

एमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्या

अल्पवयीन मित्र ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूडमधील टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक तरुण आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या खुनाचा छडा लावत मृत तरुणाचे दोन अल्पवयीन मित्रच या गुन्ह्यामागे असल्याचे निष्पन्न केले. दोन्ही बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; कर्नाटकातून महिलेला अटक – सविस्तर बातमी 

विजय नाईक (१७, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी कोथरूड येथील एआरएआय टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक इसम पडलेला दिसला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोथरूड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मृत तरुणाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे यांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृत तरुण कोथरूडमधील श्रावणधारा वसाहतीत राहत असल्याची माहिती निष्पन्न झाली.

पोलिसांनी त्याची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच स्वतंत्र पथके तयार केली. गुप्त बातमीदार तसेच इतर मार्गांचा वापर करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मृत तरुणाचा खून त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी केल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एक मित्र त्याच्या राहत्या घरी लपून बसला होता, तर दुसरा मार्केटयार्ड परिसरात लपला होता. पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देऊन दोघांनाही काही वेळात ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. प्रकरणातील दोन्ही संशयित हे बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा सविस्तर तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोळे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×