Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

मित्राला फिरायला नेण्याच्या बहाणाने केला खून; घड्याळामुळे पटली ओळख

मोटारीच्या विक्रीच्या प्रयत्नात टोळके जाळ्यात

marathinews24.com

पुणे – मित्राला महाबळेश्वला फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्याच्या साथीदारांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतदेह ताम्हिणी घाटात टाकून मोटार घेऊन पसार झालेल्या दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेली मोटार विक्रीच्या प्रयत्नात असताना आरोपींना पकडण्यात आले. आदित्य गणेश भगत (वय २२,रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडे तीन हजार जणांविरुद्ध कारवाई – सविस्तर बातमी

अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मी विहार अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) यांना अटक केले आहे. प्रज्वल ऊर्फ सोन्या संतोष हंबीर (रा. वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आदित्यचा ११ जानेवारीला ताम्हिणी घाटात मृतदेह सापडला. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. जमीन खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना सणसवाडी गाव परिसरात मृतदेह पडल्याचे दिसून आले होते.

हातातील घड्याळामुळे पटली ओळख

आदित्यच्या हातातील इलेक्ट्रॉनिक्स घड्याळामुळे माणगाव (जि. रायगड) पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी काही तासात आरोपींची नावे निष्पन्न करीत त्यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिरुमला रजनीकांत, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत,पोलीस निरीक्षक अलका सरग, एपीआय कैलास डाबेराव, गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, प्रीतम निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतिरक यांनी केली.

असा केला मित्राचा खून

अनिकेत, तुषार, प्रज्ज्वल हे ११ जानेवारीला आदित्यच्या मोटारीतून महाबळेश्वरला फिरायला जात होते. आर्थिक वादातून तिघांनी आदित्यचा खून करीत मृतदेह घाटात टाकून दिला. दरम्यान, बाणेर ठाण्याचे कर्मचारी प्रीतम निकाळजे हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी अनिकेत हा ननावरे पुलाजवळ थांबून मोटार विक्रीच्या तयारीत असल्याचे समजले. पथकाने अनिकेतला ताब्यात घेत मोटार जप्त केली. त्याने तुषार आणि प्रज्ज्वल यांच्याशी संगनमत करुन आदित्यचा खून केल्याची कबुली दिली.

मित्राचा खून केल्यानंतर त्याची मोटार चोरून आरोपी गाडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बाणेर ठाण्यातील अमलदाराला मिळाली. त्याअनुषंगाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून केल्याची कबुली दिली.

चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×