Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एनए नवीन मालिका सुरू

आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी एनए ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी एनए मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता इच्छुक वाहनमालकांनी विहित नमुन्यात अर्ज करून तीनपट शुल्क भरावे. यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तसेच दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्याकरिता दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येतील.

सहभागी प्रत्येक विद्यार्थी हा विजेताच : संजय कुमार राष्ट्रीय कला उत्सवाचा जल्लोषपूर्ण समारोप – सविस्तर बातमी

सदर अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथील नवीन वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह सादर करावेत. डिमांड ड्राफ्ट DY. R.T.O., Pimpri Chinchwad यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेचा असावा. अर्जदाराचा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी अर्जदारांची यादी दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावासाठी अधिक रकमेचा डीडी सादर करावयाचा असल्यास तो दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास पसंतीचा नोंदणी क्रमांक वितरित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी अर्जदारांची यादी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. लिलावासाठी अधिक रकमेचा डीडी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात सादर करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिलाव प्रक्रिया पार पडेल.

वाहन क्रमांक आरक्षित झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेणे आवश्यक आहे. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव दिनांकापासून 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी शासनजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी क्रमांकासाठी भरलेली फी परत अथवा समायोजित केली जाणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×