Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Neelam Gorhe : शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गौरींचे मंगल आगमन; भक्ती आणि उत्साहाने फुलले वातावरण…

Neelam Gorhe : शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गौरींचे मंगल आगमन; भक्ती आणि उत्साहाने फुलले वातावरण...

आल्या आल्या गौरी ,सोन्या मोत्यांच्या पावलांनी

marathinews24.com

पुणे – “आल्या आल्या गौरी सोन्यामोत्यांच्या पावलांनी’या पारंपरिक गजराची अनुभूती देत दि.१७ रोजी, शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या निवासस्थानी गौरींचे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात आगमन झाले. गौरींच्या आगमनाने घराचा उंबरठा मंगलमय झाला आणि वातावरणात भक्ती, आनंद व आपुलकीचे रंग भरले.

पुण्याच्या सीएनजी-पीएनजी पुरवठा व्यवस्थेला मोठी चालना – सविस्तर बातमी 

यावेळी Neelam Gorhe यांच्या भगिनी जेहलम जोशी उपस्थित होत्या. गौरींच्या आगमनाच्या निमित्ताने घरातील वातावरण भक्ती, आपुलकी आणि आनंदाने भारून गेले. गौरी उत्सवाच्या परंपरेविषयी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “गौरीचा सण हा माहेरवाशिणींचा सण म्हणून जसा ओळखला जातो, तसाच तो नवनिर्मितीचा आणि विविध नातेसंबंध अधिक दृढ करणारा उत्सव आहे. गौरींचे आगमन म्हणजे धान्य, झाडे, पक्षी आणि संपूर्ण सृष्टीसाठी सुपीकता, समग्रता आणि संपन्नतेची चाहूल असते. या उत्सवाचे वैशिष्ट्य केवळ आर्थिक समृद्धीपुरते मर्यादित नाही, तर तो माणसाला आनंदी, सुखी आणि समाधानी करणारा आहे.”

“गौरी-गणपतीच्या निमित्ताने आप्तजन, स्वकीय आणि हितचिंतक यांच्या भेटीगाठी होतात. सर्वजण एकत्र येऊन गौरी-गणपतीच्या चरणी प्रार्थना करतात, हा या उत्सवातील आनंदाचा आणि आपुलकीचा महत्त्वाचा भाग आहे. आमच्या घरात जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ गौरीचा सण साजरा केला जात आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीच्या आणि धार्मिक श्रद्धेच्या या प्रवाहात आपणही सहभागी होतो, ही भावना मनाला अतिशय आनंद आणि समाधान देणारी आहे. या उत्सवातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा पुढील वर्षभर मनाला नवी उमेद आणि बळ देत राहते,” अशी भावना डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केली.

गौरींच्या आगमनाने घरातील वातावरण भक्तीमय झाले असून, “गौरीमातेच्या चरणी प्रार्थना आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो. महाराष्ट्रातील प्रत्येक घर आनंदाने, प्रेमाने आणि मांगल्याने भरून जावो,” अशी प्रार्थनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×