पुढे साहेब आहेत गळ्यातील सोनं काढून ठेवा

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

ज्येष्ठ महिलेची फसवणूक

marathinews24.com

पुणे – पुढे साहेब लोक उभे असून, तुम्ही गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून ठेवा. अशी बतावणी करत दोघा चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून, पादचारी जेष्ठ नागरिकांची लुट करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असल्याचे दिसून आले आहे.

सुसाट बुलेट चालवली अन पोलिसांनी नजरेत आला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला बुधवारी (दि. १७) सकाळी साडेनऊच्या सुमारास चंदननगर परिसरातून जात होत्या. त्यावेळी समोरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. पुढे साहेब लोक आहेत, तुमच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून ठेवा असे सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ महिला गळ्यातील दागिने काढून बॅगेत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना आम्ही दागिने बॅगेत ठेवतो अशी बतावणी करून महिलेला बोलण्यात गुंतवले. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. – सहायक पोलिस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×