सुसाट बुलेट चालवली अन पोलिसांनी नजरेत आला

सुसाट बुलेट चालवली अन पोलिसांनी नजरेत आला

तिघांकडून हत्‍यार जप्‍त; कॉप्स मार्शलची कामगिरी

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगात बुलेटवर निघालेल्‍या तिघांना पेट्रोलिंग करणारे आंबेगाव पोलिस ठाण्यातील मार्शल अभिजीत बाठे व सांगर खंडाळे यांनी ताब्यात घेतले. त्‍यांची झडती घेतली असता त्‍यांच्‍याकडून धारदार हत्‍यारे जप्‍त करण्यात आली. ही कारवाई जांभुळवाडी येथे करण्यात आली.
प्रथमेश नितीन पंडीत ( वय २३ रा, अष्टविनायक मंडळाजवळ, आंबेगाव), निखील बापू गायकवाड (वय २१) आणि दिपक गणेश गायकवाड ( वय १९, तिघेही रा, आंबेगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्‍यांची नावे आहेत.

ससूनमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसुती; तरुणावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

बीट मार्शल अमंलदारांनी जांभुळवाडी तलावाजवळ एका बुलेटवर भरधाव वेगात चाललेल्‍या तिघांना थांबविले. त्‍याच्‍याकडे चौकशी केल्‍यानंतर दोन लोखंडी धारदार हत्‍यारे सापडली. याप्रकरणी तिघांवर शस्‍त्र बाळगल्‍याप्रकरणी तसेच मोटार वाहन अधिनियमना नुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्‍हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त विजय कुंभार, युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाह, अमंलदार अभिजीत बाठे, सागर खंडाळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×