Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

“टॉप क्लास शिक्षण” योजनेअंतर्गत ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत ओबीसी (इतर मागासवर्गीय), ईबीसी (आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय) व डीएनटी (भटक्या व विमुक्त जमाती) विद्यार्थ्यांसाठी “टॉप क्लास शिक्षण” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीच्या महाराष्ट्रातील नामांकित शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

सागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा – सविस्तर बातमी

शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळ https://scholarships.gov.in वर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, पुणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदीप संकपाळ, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×