पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य

नांदेड सिटी पोलिसांकडून गुन्हा

marathinews24.com

पुणे – जेवण केल्यानंतर रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीशी अश्लील कृत्य करुन एक जण पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्पीडब्रेकरच्‍या वादातून तेरा जणांकडून मारहाण – सविस्तर बातमी

याबाबत एका तरुणीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शनिवारी रात्री जेवण करुन घरातून बाहेर पडली. सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरातून ती निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या बाकावर आरोपी बसला होता. तरुणीने तेथून निघाली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करुन अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाला.

घाबरलेल्या तरुणीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या आराेपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

अश्लील कृत्य करणारा अटकेत

शाळकरी मुलीला दुचाकीवरुन चक्कर मारण्याचा बहाणा करुन तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी श्रीराम आल्हाट (वय ५०, रा. कळस, विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या १४ वर्षीय मुलीला आरोपी आल्हाटने दुचाकीवरुन चक्कर मारण्याचा बहाणा केले. वाटेत त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×