शासकीय कामात अडथळा, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

चौघांविरूद्ध नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलीस अमलदाराला शिवीगाळ करणार्‍या चौघांविरूद्ध नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी पोलीस अमलादाराला जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १३ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास धायरीतील लायगुडे वस्तीवर घडली आहे.

शेअर ट्रेडींगमध्ये कमाईचे आमिष पडले ४२ लाखांना – सविस्तर बातमी

गणेश संभाजी पाटील (वय ४०), दिलीप संभाजी पाटील (वय ३८), किर्ती संजय बोरसे (वय ४०), भाविका संजय भोसले वय (४० सर्व रा. लायगुडे वस्ती, धायरी)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अमंलदार मोहन मिसाळ यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील कुटूंबियाने पोलीस अमलदार मिसाळ यांच्या गणवेशाची कॉलर धरली. त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×