शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात एकाला अटक

शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात एकाला अटक

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. पीडित मुलींच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध अश्लील कृत्य करणे, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

लिफ्टमध्ये मुलीशी अश्लील कृत्य करणारा अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विवाहित आहे. तिचे पतीसोबत पटत नसल्याने ती त्याच्याबरोबर राहत नव्हती. तिला १५ आणि १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. महिला आरोपीसोबत राहत होती. महिला कामावर गेल्यानंतर आरोपी मुलींना कामे सांगायचा. मालिश करुन देण्याच्या बहाण्याने त्याने मुलींशी अश्लील कृत्य केले. लहान मुलीवर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती आईला दिल्यास वडिलांकडे सोडेल, अशी धमकी आरोपीने मुलींना दिली. घाबरलेल्या मुलींनी आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक देवताळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×