Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

येरवडा कारागृहात कैद्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

येरवडा पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – येरवडा कारागृहात सराईतांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल नागनाथ कांबळे (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्यमुखी पडलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जयजवाननगर, येरवडा), दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी काॅलनी, कामशेत) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीओ खरेदीच्या बहाण्याने ५३ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे, चंडालिया, रेड्डी यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. कांबळेने २०१९ मध्ये एकाचा खून केला होता. याप्रकरणात तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. चंडालिया आणि रेड्डी यांना गंभीर गु्न्ह्यात अटक करण्यात आली होती. कारागृहात कांबळे, चंडालिया, रेड्डी हे एकाच बराकीत राहत होते. कारागृहातील वर्चस्वातून कांबळे याचे चंडालिया आणि रेड्डी यांच्यात वाद झाले होते. कांबळेला मारहाण करण्याचा कट चंडालियाने रचला होता.

चंडालिया आणि रेड्डी यांनी सोमवारी (१५ डिसेंबर) सकाळी बराकीत कांबळे याच्यावर झोपेत फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. घाबरलेले कैदी बराकीतून बाहेर पळाले. या घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी कांबळे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केला. चंडालिया आणि रेड्डी यांच्याविरुद्ध सुरुवातीला याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या कांबळेचा शुक्रवारी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चंडालिया आणि रेड्डी यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×