Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन

शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या उद्देशाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस केला जातो साजरा 

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळात सुस्थितीत जीवन व्यतीत करता यावे, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या उद्देशाने ऑक्टोंबर महिना राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय : व्याज परताव्यासोबतच उद्योजकता प्रशिक्षण – सविस्तर बातमी 

याचे औचित्य साधून दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण पुणे विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे “ज्येष्ठ नागरिक दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवक यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. तसेच, समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर-सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव करण्यात येईल.

यावेळी सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व संबंधित संघटनांना कार्यक्रमास व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×