Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

हर घर तिरंगा अभियानास इंदापूरात उत्सर्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी रमेश ढगे

हर घर तिरंगा अभियानास इंदापूरात उत्सर्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी रमेश ढगे

शहरात विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रमाचे आयोजित

marathinews24.com

पुणे – इंदापूर नगरपरिषदेच्यावतीने हर घर तिरंगा, घरघर तिरंगा स्पर्धा व अभियानांतर्गत शहरात विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रमाचे आयोजित करण्यात आले, या उपक्रमास उत्सर्फूत प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली आहे.

गोकवडी गावात जलसंधारण व शैक्षणिक सुविधांचा यशस्वी उपक्रम – सविस्तर बातमी 

शहरात ७ ऑगस्ट रोजी विद्या प्रतिष्ठान येथे वृक्ष लागवड, नागरिकांना “हर घर तिरंगा, घरघर तिरंगा”अभियानाची माहिती देऊन देशभक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे स्वच्छता कर्मचारी यांचा गुणगौरव, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अमृत वाटिका येथे विविध संस्था, नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.नगरपरिषद कार्यालयापासून ४० फूट रोड –दर्गा मज्जिद चौक –नेहरू चौक – बाबा चौक मार्गे पुन्हा नगरपरिषद असा मार्ग घेत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. नारायणदास रामदास हायस्कूल येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.

शहरात ११ ऑगस्ट नारायणदास रामदास हायस्कूल येथे राखी स्पर्धा आणि १२ ऑगस्ट रोजी नारायणदास रामदास हायस्कूल येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. नगरपरिषद प्रांगणात शहरातील बचत गट व महिला यांच्या सहभागातून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी स्वच्छता व देशभक्तीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्यांद्वारे सुंदर कलाकृती साकारल्या.

या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश देण्यात आले. हर घर तिरंगा, घरघर तिरंगा अभियानांतर्गत इंदापूर शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले आहे, अशी माहिती श्री. ढगे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×