Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर

पाच फुटाचा बच्चन" मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर

एकपात्री नाटक ते सिनेमा : पाच फुटाच्या बच्चनचा दैदीप्यमान प्रवास

marathinews24.com

पुणे – नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान – सविस्तर बातमी 

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचं संकलन, शंतनु-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. तसेच निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. या सगळ्यात ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या टीजर पोस्टरनंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या सिनेमाच्या आकर्षक चित्रशीर्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या टीजर पोस्टरवरुन हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याच्याशी निगडीत आहे असे दिसत आहे. एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती रिंगण करून कीर्तनात दंग झालेले वारकरी असे हे चित्र आहे. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पाच फुटाचा बच्चन’या एकपात्री नाटकाचा प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या प्रयोगांनाही तुफान प्रतिसाद मिळत राहिला. मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे प्रयोग केले. अनेक पुरस्कारांमध्ये नामांकन, पुरस्कार मिळाले, महोत्सवांमध्ये नाटकाचं सादरीकरण झालं. नाटकावर येत असलेल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढत होता. या नाटकावर चित्रपट होऊ शकतो याची जाणीव होत होती. निर्माते राहुल कर्णिक यांनी या नाटकाचा चित्रपट करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे नाटकाचे प्रयोग योग्य टप्प्यावर थांबवून आम्ही चित्रपट निर्मितीच्या कामाला सुरुवात केली . अस्सल मातीतली कथा भव्य स्वरुपात पडद्यावर चित्रित करण्यासाठी लागणारा तांत्रिक संघ तयार करून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर इथे गेल्या वर्षभरात चित्रीकरण केलेले आहे. आता ‘पाच फुटाचा बच्चन’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×