Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

ग्रामपंचायत सेवकावरील हल्ल्याचा पॅन्थरकडून निषेध; दिपक केदार यांनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा पॅंथर सेनेचा इशारा

marathinews24.com

बीड : अनंत जाधव  – बीड मधील गेवराई तालुक्यातील नादलगाव येथे अदिवासी कोळी महादेव (एसटी) समाजाचे ग्रामपंचायत सेवक जालिंदर मच्छिंद्र सुरवसे यांच्यावर काही गावातील लोकांनी कायदा हातात घेऊन मॉब लिचिंगसदृश अमानवीय मारहाण केल्याची गंभीर घटना दि.६ डिसेंबर रोजी घडली होती . या मारहाणीत पीडित जालिंदर सुरवसे यांचे दोन्ही पाय व हात फॅक्चर झाले असून पाय, डोके, हात व पाठीवर गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य – सविस्तर बातमी

या घटनेची माहिती दि.८ डिसेंबर सोमवार रोजी मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी तात्काळ बीड शासकीय रुग्णालय गाठले आणि पीडिताची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन हा हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॅावत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, पोलिस अधीक्षकांनी पीडिताचा तक्रार नोंदवून तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ऑल इंडिया पँथर सेनेने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून मॉब लिचिंगसदृश ही घटना असल्याने सर्व आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३०७ सह इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. या भेटीप्रसंगी ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सुंदर वाघमारे, सुर्यकांत ठोकळे, राजेश वाघमारे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याघटनेमुळे नादलगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दलित- आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याची मागणी देखील ऑल इंडिया पॅन्थरसेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×