पुण्यात सदाशिव पेठेत इमारतीचा काही भाग काेसळला

पुण्यात सदाशिव पेठेत इमारतीचा काही भाग काेसळला

१० रहिवाशांची सुटका

marathinews24.com

पुणे – शहरातील सदाशिव पेठेतील जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून १० रहिवासी अडकल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नानंतर दहा रहिवाशांची सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

सदाशिव पेठेतील चारुदत्त अपार्टमेंट या तीन मजली इमारतीतील सीमा भिंत, गॅलरी, जिन्याचा काही भाग मध्यरात्री कोसळला. या इमारतीत पाच महिलांसह दहा रहिवासी अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर भवानी पेठेतील मुख्य अग्निशन केंद्रातून रेस्क्यू व्हॅन, जनता वसाहत अग्निशमन केंद्रातील बंब, तसेच जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस, महापालिकेच्या घरपडी विभागाचे अभियंता घटनास्थळी पाेहोचले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर आणि जवानांनी मदतकार्य सुरू केले.
शिडी, सुरक्षा पट्टा (सेफ्टी बेल्ट), दोरीचा वापर केला.

जवानांनी सीताबाई बागल (वय ७०), शुभम बागल (वय २३), वनमाला बागल (वय ४५), सुनंदा निरगुणे (वय ५२), संकेत बागल (वय २३), सुरेश बागल (वय ६०), स्वप्नील बागल (वय २४), चारुशीला कुलकर्णी (वय ५२), रुपाली माने (वय ४९), कमलाकर माने (वय ५५) यांनी सुटका केली, तसेच जेनी नावाच्या श्वानाची सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×